---Advertisement---
जळगाव जिल्हा चोपडा

हेमलता देशपांडे यांच्यातर्फे वरगव्हाण जि.प.शाळेत १७६ गोरगरीब विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२२ । चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथील रहिवासी हेमलता देशपांडे या सध्या पुणे येथे कात्रज भागातील बालाजी नगररातील साई गारमेंटसच्या संचालिका, सामाजिक कार्यकर्त्या आहेत यांनी सामाजिक दायित्व जपत स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या निमित्ताने औचित्य साधून वरगव्हाण जिल्हा परिषद शाळेच्या १७६ गोरगरीब विद्यार्थ्यांना रंगीत ड्रेस वाटप करण्यात आले.

vargavan

मुळच्या वरगव्हाण येथील रहिवासी सध्या पुणे स्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील व त्यांच्या पत्नी इंद्रायणी महेंद्र पाटील (ग्रा.प.सदस्या) यांनी आपल्या गावातील गोरगरिब निकडवंत विद्यार्थ्यांची समस्या हेरुन दातृत्वशाली हेमलता देशपांडे यांच्या माध्यमातून दि. १४ ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात १७६ विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप करण्यात आले.

---Advertisement---

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अडावद पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक पोउनी किरण दांडगे यांनी भूषविले .यावेळी महेंद्र पाटील ,सरपंच भूषण पाटील,सौ.इंद्रायणी महेंद्र पाटील,जावेद बिस्मिल्ला तडवी (सदस्य), यास्मिन युनूस तडवी (सदस्या),नेमिचंद सोनार माजी सरपंच, गजानन निकम, हैदर तडवी,लतिफ तडवी,हाफिजा तडवी,मुज्जाक तडवी,सायराबाई पावरा,( सदस्या)सपना पावरा,(सदस्या) सतिष पाटील, सोनवणे मॅडम आदी उपस्थित होते.प्रास्ताविक शिक्षक राकेश पाटील व शरिफ तडवी यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका मंगला पाटील यांनी मानले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---