⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

रविवारी पहाटे धुवाधार.. अनेक परिसरात बत्ती गुल

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२१ ।  ‘तौत्के आणि यास’ चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून वातावरण बदलत झाले असून शनिवारी दिवसभर प्रचंड उकाड्यानंतर रविवारी पहाटे जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.

शनिवारी सकाळपासून कड़क उन होते. परंतु सायंकाळी ढगाळ वातावरण झाले होते. त्यानंतर जिल्ह्यात रविवारी पहाटे 3.30 वाजेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तसेच काही भागात पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. काही भागांमध्ये झाडे देखील कोसळली. तर काही घरांमध्ये पाणी शिरले होते.

दरम्यान,  सध्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण उद्यापासून राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने तसा इशारा दिला आहे.

पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बाष्प जमा झाले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच दोन जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस बरसेल, असा अंदाज आहे.

मान्सून दोन दिवसात केरळमध्ये

भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते. मात्र, मान्सूनवर यास चक्रिवादळाचा सकारत्मक परिणाम झाल्यानं यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजपूर्वी म्हणजेच 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होईल