⁠ 
[rank_math_breadcrumb]

पावसाबाबत IMD कडून हायअलर्ट! 18 जुलैपर्यंत महाराष्ट्रात मुसळधारचा इशारा, जळगावातही…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२४ । महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान हवामान विभागाकडून (IMD)पावसाबाबत हायअलर्ट देण्यात आला असून, येत्या 18 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं म्हटलं आहे. यापार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यात देखील आगामी दोन दिवस पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज रत्नागिरीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज दिवसभरत रत्नागिरीसह आसपासच्या भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघर, भागांत येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच नागपुरात पावसाची शक्यता आहे.

जळगावला आगामी दोन दिवस येलो अलर्ट?
मागील दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. काही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे शेतांमध्ये पाण्याचे तळे साचले. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान जिल्ह्यात पावसाचा जोर आगामी दोन दिवस कायम राहणार आहे. आज आणि उद्या जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सोमवारी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यादरम्यान सोसाट्याचा वारा 40- 50 किमी ताशी वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.