⁠ 
बुधवार, मे 1, 2024

हृदयद्रावक : जामटी गावाजवळ भीषण अपघात; वैजापूरचे तीन तरुण ठार, सहा गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । मध्य प्रदेशाच्या हद्दीत जामटी गावाजवळ रात्री वैजापुरच्या तरुणांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघात झाला. यात तीन तरुण जागीच ठार तर सहा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, जखमी आणि मयत तरुणांना चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे माहिती समोर आली आहे.

निलेश शांतीलाल बारेला, सगदीश केरसिंग बारेला, पंकज प्रकाश बारेला (वैजापूर ता.चोपडा) असे मयत झालेल्या तरुणांचे नाव आहे. मध्य प्रदेशाच्या हद्दीत जामटी ता. वर्ला जि. बडवाणी येथे रात्री ९ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. वैजापूर येथील मयत यांच्यासह इतर सहा तरुण मध्य प्रदेशात कबड्डीच्या स्पर्धा बघण्यासाठी जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाहीय. परंतू घटनास्थळावर दोन तरुण जागीच ठार झालेत. तर दोन गंभीर जखमी तरुणांना जळगाव जिल्हा रुगणालयात हलविण्यात आले होते.

त्यातील एकाचा पहाटे चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याचे कळतेय. दरम्यान, चोपडा शहर पोलिसात अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात आली असून शून्य क्रमांकाने गुन्हा मध्य प्रदेशात वर्ग केला जाणार आहे. मयत आणि जखमींची नावे अद्याप कळू शकली नाहीत.