महादेव हॉस्पीटल येथे आता हृदयरोग तपासणी व उपचार मोफत

मे 12, 2026 11:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । उन्हाळयात हदयविकाराचा धोका अधिक असतो आणि हदविकारावरील उपचाराचा खर्च देखिल अफाट असल्या कारणारे येथील महादेव हॉस्पिटलमध्ये आजपासून हदयरोग तपासणी शिबिरास प्रारंभ झाला असून आता हृदयरोग तपासणी व उपचार मोफत केले जाणार आहे.

Cardiac screening

जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरात असलेल्या महादेव हॉस्पिटल मध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळयात हदयविकाराचा त्रास अनेक रूग्णांना जाणवत असतो पण अफाट खर्चामूळे या कडे दुर्लक्ष केले जात असल्याने रुग्णालयाने जाहीर केल्यानुसार, मोफत हदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदयरोग तपासणी, इसीजी आणि २डीइको तपासणी पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. योजनेअंतर्गत हृदयाची अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी आणि पेसमेकर यांसारख्या अत्याधुनिक सुविधा मोफत उपलब्ध आहेत.यासाठी तज्ञांची टीम तैनात करण्यात आली असून कार्डिओलॉजी विभागात डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. जिशा सैय्यद, डॉ. सिधेश्वर खांडे आणि डॉ. मनमिता रेड्डी यांसारखे तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत रूग्णालयात हे तज्ञ तपासणी करणार असून रुग्णालय २४ तास आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध आहे. या मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांकडे रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)आधार कार्ड आयुष्मान कार्ड आवश्यक आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी नागरिकांनी ९११२०३००५५ किंवा ९११२०४००५५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रूग्णालयामार्फत करण्यात आले आहे.

घामामुळे शरीरातील पाणी व खनिजे कमी होतात, ज्यामुळे रक्तदाब असंतुलित होतो,हृदयावर अतिरिक्त ताण पडतो डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होते आणि नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढते. यामूळे छातीत तीव्र वेदना, जडपणा किंवा अस्वस्थता (सामान्यतः गॅस किंवा सिडिटी समजून दुर्लक्षित केली जाते)बसल्या जागी किंवा वातानुकूलित खोलीत असतानाही अचानक खूप थंड घाम येणे चक्कर येणे किंवा डोळ्यासमोर अचानक अंधारी येणे डाव्या हातामध्ये, खांद्यात, किंवा जबड्यात वेदना होणे कोणतेही कष्टाचे काम न करता अचानक श्वास कोंडणे इ लक्षणे जाणवल्यास ताबडतोब रूग्णालयात दाखल व्हावे.डॉ.सिधेश्वर खांडे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now