⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | बांभोरीला आरोग्य तपासणी शिबीर

बांभोरीला आरोग्य तपासणी शिबीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२२ । धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथे समता फौंडेशन,मुंबई व चांदसर आरोग्य केंद्र अंतर्गत बांभोरी प्र चा उपकेंद्र, व बांभोरी प्रचा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भवती महिला, कुपोषित बालक व अति जोखमीच्या गर्भवती माता यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर व प्लास्टिक मुक्त भारत अभियानचे आयोजन करणयात आले होते. यावेळी गावातील कुपोषित मुले,अति जोखमीच्या गर्भवती माता,महिला यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

कुपोषित बालकांना व गर्भवती मातांना समता फौंडेशन आणि बांभोरी प्र चा उपकेंद्र तर्फे मोफत औषधोपचार करण्यात आले. बांभोरी गावातील गर्भवती माता व मुलांना दिवाळीत सुदृढ आयुष्य मिळावे यासाठी ग्रामपंचायत व उपकेंद्र तर्फे सर्व उपाययोजना करण्यात येतील असे मत बांभोरी प्रचा चे सरपंच श्री.सचिन बिऱ्हाडे यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे मुलांना व मातांना आरोग्य विषयक घ्यावयाच्या काळजी बाबत व महिलांना होणाऱ्या स्तनाचा,गर्भाचा व इतर कर्करोग बद्दल आरोग्य अधिकारी डॉ.प्रीती पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच समता फौंडेशन,मुंबई चे राजेंद्र दोंड यांनी समता फौंडेशन च्या ग्रामीण भागातील कुपोषित बालक व गर्भवती माता च्या आरोग्यासाठी कार्यतत्पर राहील माहिती दिली.

त्याच प्रमाणे दिवाळी पूर्व कवियत्री उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव येथील समाजकार्य मार्फत शासनाच्या प्लास्टिक मुक्त भारतअंतर्गत गावातील नागरिकांना मोफत कागदी पिशव्यांचे वाटप ही करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत सदस्य संदीप कोळी,MPW प्रशांत पाटील,ANM प्रीती निकम,आशा सेविका-सपना नन्नवरे,अंजना नन्नवरे,ज्योती सोळंके,सोनी नन्नवरे,अंगणवाडी सेविका, चमेला भालेराव, आशा बाविस्कर,रंजना नन्नवरे व विद्यापीठ प्रतिनिधी अक्षय महाजन गावातील युवक-युवती महिला व बालक उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह