⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | अतिदुर्गम भागात आरोग्य तपासणी शिबीर; ९६ रुग्णांनी घेतला लाभ

अतिदुर्गम भागात आरोग्य तपासणी शिबीर; ९६ रुग्णांनी घेतला लाभ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेले छोटेचे गाव म्हणजे पांढरी येथे आदिवासी बांधव वास्तव्यास आहे. या गावात २७रोजी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिराचा तब्बल ९६ रुग्णांनी लाभ घेतला. यात गरोदर माता, प्रस्तुती झालेल्या माता, कमी वजनाचे बालके, यांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.

समता फाऊंडेश औरंगाबाद यांच्या सहकार्याने व तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर यांच्या मार्गदर्शनाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. समता फाऊंडेशन औरंगाबाद तर्फे उपलब्ध करून दिलेली औषधी, प्रोटीन्स पावडर, गरोदर मातांच्या रक्त वाढीसाठी, तसेच आईच्या गर्भात असलेल्या बाळाचे चांगल्या प्रमाणे वाढ होण्यासाठी आणि कमी वजनाच्या बालकांसाठी उत्तम दर्जाची औषधे पांढरी या गावात उपलब्ध करून दिली. ९६ रुग्णांची तपासणी करून औषधे देण्यात आली. यावेळी समता फाऊंडेशनचे प्रतिनिधी राजेंद्र दौंड, प्रविण पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख(पंचक), आरोग्य सेविका भिकूबाई बोदडे,आरोग्य सेवक राहुल सोनवणे, जवाहरलाल महाजन, गट प्रवर्तक एलिझा मोरे, लॅब असिस्टंट दीपमाला महाजन, अंगणवाडी सेविका ललिता पावरा, आशा वर्कर प्रिती बारेला आदी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह