---Advertisement---
जळगाव जिल्हा

एकदिवसीय सहलीचे नियोजन करताय? मुक्ताईनगर तालुक्यातील ‘हे’ ठिकाण ठरेल सोयीचं

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) फिरण्या योग्य अनेक ठिकाणी आहेत. जर तुम्हीही येणाऱ्या रविवार सुट्टीच्या दिवशी जवळच्या ठिकाणी सहलीचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी हरताळे (Hartale) (ता. मुक्ताईनगर) सोयीचे ठिकाण ठरू शकते. हे निसर्गसौंदयनि बहरलेले स्थळ आहे.

hartale

हरताळे येथे काय पाहाल :
समृद्ध निसर्ग संपदा आणि ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या हरताळे तलावाच्या काठावर तीन धार्मिक स्थळे आहेत. श्रावणबाळ समाधी, महादेवाचे पुरातन मंदिर, श्रीकृष्ण मंदिर ही ठिकाणे तलावाच्या पूर्वेकडे, तर पश्चिम बाजूने साईबाबांचे सुंदर मंदिर आहे. कमळपुष्पांसाठी सुद्धा हा तलाव प्रसिद्ध आहे.

---Advertisement---

भुसावळपासून 32 किमी अंतर:
भुसावळ येथून राष्ट्रीय महामागनि मुक्ताईनगरकडे प्रवास करताना २९ किमी अंतरावर हरताळे व चांगदेव फाटा आहे. येथील उड्डाणपुलाखालून उजवीकडे हरताळे गाव सुमारे तीन किमी अंतरावर आहे. या गावाच्या बाजूलाच विस्तीर्ण असा हरताळा तलाव आहे. काही वर्षांपूर्वी तेथे फ्लेमिंगो पक्षी सुद्धा मुक्कामी होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---