⁠ 
सोमवार, मे 6, 2024

हरीभाऊ पाटलांचे पाचोरा तहसील कार्यालयासमोर उपोषण

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । पाचोरा ग्रामीण रूग्णालयात चुकीच्या उपचारामुळे बालक दगावल्याने संबंधीतांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ पाटील हे ४ जुलैपासून पुन्हा उपोषण करत आहेत.

पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या चुकीच्या उपचारामुळे दि. १० मे रोजी नुकत्याच जन्मलेल्या नवजात बाळाला पावडरचे दुध पाजल्यामुळे मयत बाळाची प्रकृती खालावल्यामुळे सदर बाळाला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली होती. यातून बाळाचा मृत्यू झाला. या बाळाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी हरीभाऊ पाटील यांनी दि. १३ जुन रोजी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात केली होती.

दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक जळगांव यांनी संबंधीत उपोषण तुर्त १० दिवस स्थगित करावे असे लेखी पत्र त्यांच्या कर्मचार्‍याच्या हस्ते देवुन विनंती केल्यामुळे हरीभाऊ पाटील यांनी सुरू असलेले आमरण उपोषण तुर्त १० दिवसांसाठी स्थगित केले होते. परंतु संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक यांनी १० दिवसांच्या केलेल्या विनंती नुसार कोणतीही योग्य कार्यवाही केली नाही आणि तसा १० दिवसांत कोणताही पत्रव्यवहार केलेला नसल्याने तसेच हरीभाऊ पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना १० दिवसाची म्हणजेच दि. ३ जुलै पर्यंत दिलेली वाढीव मुदत संपली तरीसुद्धा जिल्हा शल्यचिकित्सक यांनी मयत बाळाच्या मृत्यूची कोणतीही दखल घेतली नाही. दोषी कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई केली नाही. म्हणून आज दि. ४ जुलै पासुन बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ पाटील हे पाचोरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे.