विवाहितेचा कार घेण्यासाठी ५० हजारा साठी छळ
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । यावल शहरातील व्यास नगरातील माहेर असलेल्या २२ वर्षीय विवाहितेचा माहेरून कार घेण्यासाठी ५० रुपये हजार रुपये आणावे व दुसरे लग्न करायचे असल्याने फारकत घ्यावी म्हणून तिचा छळ केला व तिला मारहाण करून दुखापत केली तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात पतीसह पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरातील व्यास नगरातील माहेर असलेल्या गायत्री रोहित भिडे वय २२ या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह एक मे २०१८ रोजी रोहित संजय भिडे रा. निंबा चौक, गुरु स्टॉप दोंडाईचा, ता. शिंदखेडा यांच्या सोबत झाला होता. लग्नानंतर पतीने तिच्याकडे माहेरहून कार घेण्यासाठी पन्नास रुपये हजार रुपये आणाव तसेच तू मला आता आवडत नाही मी दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो तु मला मुलगा देऊ शकत नाही. मला दुसरे लग्न करायचे आहे म्हणून फारकत दे असे सांगून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला व तिला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच तिच्या पतीने तिला मारहाण करीत धातूचे कड्याने दुखापत केली.
तेव्हा याप्रकरणी यावल पोलिसात पती रोहित संजय भिडे, सासू रेखा संजय भिडे, सूर्याबाई प्रकाश टोपे रा. निंबा चौक गुरु स्टॉप, ९ नंबर शाळेजवळ दोंडाईचा, ता. शिंदखेडा तसेच वंदना शक्ती सारसर आणि अंजली प्रवीण सारसर दोन्ही रा. शनिपेठ जळगाव अशा पाच जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे