⁠ 
मंगळवार, मे 14, 2024

जनसंवाद यात्रेत रोहिणी खडसेंनी आदिवासी पाड्यांवर साधला संवाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या 23 व्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील हलखेडा, लालगोटा, जोंधनखेडा,राजुरा, उमरा, हिवरा येथील ग्रामस्थांसमवेत अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी संवाद साधला तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी  निवृत्ती पाटील, यात्रा प्रमुख  ईश्वर रहाणे,  तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, दशरथ कांडेलकर, डॉ.बी.सी.महाजन, रवींद्र दांडगे, रामभाऊ पाटील, प्रदीप साळुंखे, अतुल पाटील, विकास पाटील, पवन  पाटील, गजानन पाटील, प्रवीण कांडेलकर, संतोष कांडेलकर, बुलेष्ट्रीन भोसले, मधुकर गोसावी, रवींद्र पाटील, मयुर साठे, भैय्या कांडेलकर, आशिष हिरोळे, सुशील भुते, विशाल रोटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले.

नाथाभाऊंनी समाजाला प्रवाहात आणला
रोहिणी खडसे म्हणाल्या की, हलखेडा येथील आदिवासी समाजातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या आदिवासी समाजाला नाथाभाऊ यांनी ओळख दिली, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. आदिवासी पाड्यापर्यंत शासकीय योजना आणून योजनांचा लाभ मिळवून दिला तसेच पाड्यापर्यंत डांबरी सडक व इतर मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याचेही त्या म्हणाल्या.