जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । भारताच्या स्वातंत्राच्या ७५व्या वर्षानिमित्त “स्वातंत्राचा अमृत महोत्सव” कार्यक्रमातंर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात येणार असून स्वातंत्र दिनाच्या पुर्वसंध्येला दि.१३ ते दि.१५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरावर तिरंगा झेंडा फडकविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने बोदवडात देखील भाजपातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यात सर्व नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फड़कवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर बैठकीत “हर घर तिरंगा” अभियानाची जवाबदारी सोपविण्यात आलेल्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून माहिती देण्यात आली व सदर अभियानात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून आपल्या बोदवड़ तालुक्यात अभियान यशस्वी करण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी बोदवड़ तर्फे करण्यात आले. बैठकीला भाजपा तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटिल, तालुका सरचिटणीस राजेंद्र डापसे, अमोल देशमुख, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष रोहीत अग्रवाल, भाजपा शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, सरचिटणीस वैभव माटे, युवा मोर्चा जिल्हा कोषाध्यक्ष राम आहूजा, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस उमेश पाटील, शहराध्यक्ष अभिषेक झाबक, उपाध्यक्ष राहुल माळी, जीवन माळी, भारतीय जनता पार्टी चे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय अग्रवाल, मयुर बडगुजर, परमेश्वर टिकारे, ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस चेतन तांगड़े, महिला तालुकाध्यक्ष वैशाली कुलकर्णी, ईं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.