एरंडोलला बचपन व ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलतर्फे ‘हर घर तिरंगा’ रॅली!

ऑगस्ट 11, 2022 1:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त एरंडोल शहरातील बचपन प्ले स्कूल आणि ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल तर्फे “हर घर तिरंगा” या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रॅलीत दर्शनी भागाला लांब असा तिरंगा फडकत होता. तसेच सजीव देखाव्यात भारत माता, स्वातंत्र्य वीर यांची वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

erandol 27

शहरातील चौकाचौकात शाळेच्या मुला-मुलींनी, स्वातंत्र्य संग्रामात जीवाचे बलिदान दिलेल्या विर हुतात्म्यांच्या जीवनावरील हुबेहुब वेषात पथनाट्य व संदेशपर गीते सादर करण्यात आले. राष्ट्र देशभक्तीपर गीतांनी व जयघोषणांनी शहर व परिसर दुमदुमून निघाला होता, अवघ्या शहरात तिरंगामय वातावरण निर्माण झाले. या रॅलीतून दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा ध्वज लावण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी संस्थेचे प्रेरणास्थान प्रा. प्रमोद पाटील व शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा.सुरेखा पाटील तसेच शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालकांनी सहभाग घेतला.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now