⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 27, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | हणुमंतखेडे सिम च्या विद्यार्थिनीने बनविला शून्य ऊर्जेवर आधारित शितकक्ष

हणुमंतखेडे सिम च्या विद्यार्थिनीने बनविला शून्य ऊर्जेवर आधारित शितकक्ष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२१ । सध्याच्या वातावरणात प्रत्येकाने स्वताला आधुनिक बनविणे काळाची गरज आहे. या गोष्टीला अवसरून शेताकर्यांनी देखील आधुनिक राहावे म्हणून ग्रामीन कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत क. का .वाघ. कृषी महाविदयालयातील विद्यार्थीनी तालुक्यातील हणुमंतखेडे सिम येथील कृषिकन्या ऐश्वर्या संजय पाटील या विद्यार्थिनीने शेतकऱ्यांनी पिकवलेला माल साठवून ठेवता यावा यासाठी शून्य ऊर्जेवर आधारित शितकक्ष बनवला आहे.

या वेळेस विकता यावा यासाठी पिकवलेला माल साठवण्यासाठी वीट,बांबू.पाईप,खाली पोती याचा वापर करून शितकक्ष कसे निर्माण करता येईल याचे उत्तम उदाहरण कु पाटील यांनी केले आहे. या शिताकक्षाचे वातावरण बाहेरील वातावरणा १० ते १५ सेल्सिअस ने कमी असते म्हणून शेतकरी आपल्या मालाची साठवणूक जास्त वेळ करू शकतो.
फळांची साठवण कमी तापमान आणि योग्य आद्रतेमध्ये केल्यास साठवण कालावधी वाढविणे शक्‍य आहे. शितकक्षात साठवणूकीमुळे शेतकऱ्यांनी पीकवलेला भाजीपाला फळे जास्त काळ टिकतात. या शितकक्षात कोणत्याही ऊर्जेचा वापर होत नाही शितकक्षाची उभारणी कमी खर्चात व सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यात होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीषकुमार हाडोळे ,कार्यक्रम अधिकारी प्रा. परमेश्वरी पवार , प्रा. सुनील बैरागी व प्रा. निलेश गडगे यांचे मार्गदर्शन लाभले

author avatar
टीम जळगाव लाईव्ह