⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

वढोदा पानाचे येथे महिला सरपंच व उपसरपंचामध्ये हमरी – तुमरी

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा पानाचे ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभा चालू असताना गावाच्या विकासासाठी शासनाने पाठविलेल्या निधीतुन निवीदे प्रमाणे काम न करता सरपंच स्वप्ना संदीप खिरोळकर व ग्रामसेवक विजय अशोक भिवसने यांनी निधीचा अपहार केला. व नित्कृष्ठ दर्जाची कामे केल्याचा आरोप करीत उपसरपंच रंजना हरिदास कोथळकर यांनी जाब विचारला . या कारणांवरून सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या मध्ये हमरी – तुमरी होवुन अश्लिल शिवीगाळ केली . या प्रकरणी उपसरपंच रंजना कोथळकार यांनी कुऱ्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली . यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे . याबाबत मिळालेल्या माहीती नुसार वढोदा येथे शासनाच्या विविध योजनेतंर्गत गावातील विविध विकास कामांसाठी निधी दिला आहे .

यामध्ये रस्ता काँक्रीटीकरण, गटारी अशा विविध कामांचा समावेश आहे . मात्र, ग्राम पंचायतीच्या माध्यमातुन करण्यात आलेली कामे नित्कृष्ट दर्जाची तसेच निवीदे प्रमाणे काम न करता या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाला असल्याच्या कारणावरून उपसरपंच रंजना कोथळकार यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद व सबंधीत विभागाकडे निवेदनाद्वारे तक्रार करून माहीतीच्या अधिकाराखाली माहीती मागीतली आहे . याबाबत बुधवारी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत उपसरपंच रंजना कोथळकार यांनी गावाच्या हितासाठी विचारणा केली असता सरपंच स्वप्ना खिरोळकर व ग्रामसेवक विजय भिवसने यांना राग आल्याने तिघांमध्ये हमरी – तुमरी होवुन सरपंच यांनी अश्लिल शिवीगाळ करीत अपमानास्पद वागणूक दिली . यामुळे उपसरपंच रंजना कोथळकार यांनी आपल्या मुलास बोलावुन मोबाईलमध्ये या सर्व प्रकरणाचे छायाचित्रण करण्यास सांगीतले असता सरपंच व ग्रामसेवक यांनी मोबाईल हिसकावुन फेकुन मारला . यामुळे उपसरपंच रंजना कोथळकार यांनी कुऱ्हा दुरक्षैत्र पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार नोंदवली . या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .


दोन्ही एकाच पक्षाचे वढोदा हे गाव विदर्भाच्या वाटेवरील जळगाव जिल्ह्यातील किमान १४ हजार लोकसंख्येचे शेवटचे गाव असुन मुक्ताईनगर तालुक्यातील भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो . यामुळे गत काही वर्षा पासुन ग्रामपंचायती मध्ये भाजपाची एक हाती सत्ता असते . मात्र, सरपंच व उपसरपंच दोन्ही महिला एकाच पक्षाच्या असतांना दोघांमध्ये विकास कामांवरून ग्राम पंचायत कार्यालयामध्ये झालेल्या गदारोळामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे .
सरपंच स्वप्ना संदीप खिरळकर ह्या आदिवासी समाजाच्या असल्यामुळे याना अश्लील शिवीगाळ व जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी उपसरपंच रंजना हरिदास कोथळकर , यांच्या सह त्यांच्या दोन मुलांवर प्रदीप हरिदास कोथळकर , विशाल हरिदास कोथळकर यांच्या विरुद्ध अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला