तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक येथे भरती निघाली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती होणार असून तब्बल 588 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहे. HAL Nashik Bharti 2025

या नोकरीसाठी इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. आणि लवकरात लवकर अर्ज करावेत.या भरतीसाठी काही पदांसाठी 10 ऑगस्ट तर काही पदांसाठी 02 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. HAL Nashik Recruitment 2025

पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) ITI अप्रेंटिस – 310
2) इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस – 130
3) डिप्लोमा अप्रेंटिस – 60
4) नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस – 88
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/Tool & Die Maker -Jig & Fixture/Tool & Die Maker-Die & Mould/Turner/Machinist/Machinist-Grinder/Electrician/Electronics Mechanic/Draughtsman – Mechanical)/Mechanic-Motor Vehicle/Refrigeration and Air-conditioning Mechanic/Painter-General/Operator Advanced Machine Tools/Sheet Metal Worker/COPA/Welder-Gas & Electric/Stenographer-English/Food Production-General)
पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी (Aeronautical/Computer/Civil/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical/Production/Chemical/ B.Pharm
पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Aeronautical/Civil/Computer/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical)/ DMLT
पद क्र.4: BA/B.Sc/B.Com/BBA/हॉटेल मॅनेजमेंट पदवी/B.Sc (Nursing)
अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी सर्वात आधी apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जा.
यानंतर तुम्ही स्वतः ला रजिस्टर करा.
यानंतर तुम्हाला गुगल फॉर्म दिसणार आहे. तो पूर्णपणे भरायचा आहे.
यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवायची आहे.
निवड प्रक्रिया
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. दहावीच्या गुणांना ७० टक्के वेटेज देण्यात आले आहे तर आयटीआयच्या गुणांना ३० टक्के वेटेज देण्यात आले आहे.त्यामुळे तुमच्या शैक्षणिक पात्रतेवर तुमची निवड केली जाणार आहे.












