जळगाव जिल्हाजळगाव शहर

भुसावळमध्ये लाखोंचा गुटखा जप्त : पोलीसांची मोठी कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२३ । भुसावळ येथील वसंत टॉकीज जवळील गायत्री पान सेंटरमधून राज्यात प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन दुकाने व घरून सुध्दा सुमारे दोन लाखांचा गुटखा जप्त केला आहे. शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वसंत टॉकीजजवळ असलेल्या गायत्री पान सेंटरवर गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती एलसीबी पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाल्याने त्यांनी एलसीबी कर्मचार्‍यांचे पथक मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी पाठविले असता गायत्री पान सेंटरवर गुटखा, रजनीगंधा आदी पॅकेट मिळाले.

जळगाव रोडवरील दुकानात सुध्दा पोलिसांना गुटखा मिळाला. पोलिसांनी सर्व गुटखा जप्त करून शहर पोलिस ठाण्यात आणला. तेथे जप्त केलेल्या गुटख्याची मोजणी होत होती. रात्री उशीरापर्यत ही प्रक्रीया सुरू होती. सुमारे दोन लाख रूपये किंमतीचा हा गुटखा असल्याची माहिती आहे.

या पथकात डीवायएसपी आप्पासो पवार, डीवायएसपी सतीश कुळकर्णी, उपनिरीक्षक गणेश वाघमारे तसेच सहायक फौजदार युनूस शेख, सुनील दामोदरे, दिपक पाटील, श्रीकृष्ण देशमुख, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, किशोर राठोड, रणजित जाधव, प्रमोद ठाकूर यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जप्त केलेला गुटख्याचा माल शहर पोलिस ठाण्यात आणला.

एलसीबीच्या पथकाने कारवाई केल्यावर वसंत टॉकीज जवळ पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. तोपर्यत पोलिसांनी अन्य ठीकाणी तपासणी करीत गुटखा जप्त केला. पोलिसांनी प्रकाश व पियुष जोशीसह दोन जणांना चौकशीकामी ताब्यात घेतले.

Related Articles

Back to top button