रावेरात लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त; एकाला अटक, तीन फरार

जुलै 9, 2025 5:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२५ । मध्य प्रदेशामधून जळगावमार्गे राज्यात होणारी गुटखा तस्करी वाढली आहे. अशातच मध्य प्रदेशाच्या बऱ्हाणपुर येथून रावेर शहरात आणलेल्या लाखो रुपयांच्या अवैध गुटख्यावर पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केली. तर तीन जण फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. या घटनेमुळे रावेरमधील गुटखा तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

gutka jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुर येथून (एमएच ०४ एचएन १७०९) क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या गाडीतून गुटख्याचा मोठा साठा रावेर शहरात आणला जात होता. याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्वस्तिक टॉकीजजवळील बऱ्हाणपुर रोडवर छापा टाकून ही गाडी ताब्यात घेतली.

असा मुद्देमाल जप्त

गाडीची तपासणी केली असता, त्यात एकूण २ लाख ३४ किमतीचा गुटखा आढळून आला. यामध्ये १८७ प्रति पाकीटप्रमाणे ३ मोठ्या गोण्या, ३३ प्रति पाकीटप्रमाणे ३ गोण्या, १९८ प्रति पाकीटप्रमाणे २ गोण्या, २२ प्रति पाकीटप्रमाणे २ गोण्या असा गुटखा होता. या गुटख्यासोबतच गुटखा वाहून नेणारी चार लाख रुपये किमतीची गाडीही जप्त करण्यात आली, ज्यामुळे एकूण ६ लाख ३४ हजहार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

यांच्यावर गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुकेश तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात शेख मुजाहिद शेख रफिक (अटक), आसिफ अहमद जमील अहमद, कल्लू उर्फ मोहसिन शेख युनुस शेख आणि एक अनोळखी इसम अशा चार आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now