जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२४ । महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुमारे एक लाख १३ हजाराचा गुटखा व वाहतूक करणारी टाटा मैजिक या वाहनासह ३ लाख १२ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार बऱ्हाणपूर कडून टाटा मॅझीक क्रमांक एमपी ६८ टी- ०२२७ या वाहनातून गुटखा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस कॉस्टेबल सचिन घुगे, प्रमोद पाटील, समाधान ठाकुर, विशाल पाटील, संभाजी बिजागरे यांना कारवाईसाठी सुचना केली. या पथकाने रावेर येथील रुची मोटर्सजवळ ते वाहन थांबवत तपासणी केली.
त्यात ७ गोण्यांमध्ये १ लाख १२ हजार ८०० रुपये किमतीचा सुगंधीत केसरयुक्त विमल पान मसाला व तंबाखू गुटखा व २ लाख रुपये किमतीची टाटा मॅझीक गाडी असे ३ लाख १२ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला. गुटखा मालाची महाराष्ट्रात बंदी असतांना या गुटख्याची अवैध वाहतूक करतांना वाहन चालक नदिमखान ईस्माईलखान रा. कोतवाल वाडा, रावेर यास ताब्यात घेतले.
याबाबत पोलीस कॉस्टेबल महेश मोगरे यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करत आहे. हा गुटखा मोठ्या शहरांमध्ये नेला जात असल्याची माहिती मळाली