जळगावात शिंपी समाजातर्फे गुरुनानक जयंती साजरी
जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । शहरातील शिंपी समाज व युवक मंडळ तसेच अखिल भारतीय मध्यवर्ती संस्था राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुनानक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जळगाव समाजाध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे यांच्या कार्यालयातून सुमारे ६० कार्यकर्ते पायी चालून वाहे गुरुजी खालचा वाहेगुरू की फते जोबोल सोनिहाल शस्त्रीयकाल संत नामदेव महाराजांचा जयघोष देऊन गुरुद्वारा येथे गेले व तेथे निशान साहेब वर पुष्प अर्पण करून गुरुग्रंथ साहेब चे दर्शन घेतले व लगंर मधे महाप्रसाद घेतला व सामाजिक एकतेचे चे दर्शन घडविले.
या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार, जळगाव समाजाध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, जिल्हाध्यक्ष बंडू शिंपी, युवक अध्यक्ष तुषार शिंपी, उपाध्यक्ष विवेक जगताप, शहर युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी, माजी अ भा युवक अध्यक्ष मनोज भांडारकर, संचालक मुकुंदराव मेटकर, पी टी शिंपी सुरेश सोनवणे, सचिव अनिल खैरनार, प्रदीप शिंपी ,सजय ईसइ, चेतन खैरनार,सुधीर शिंपी, रत्नाकर बाविस्कर, अजय चव्हाण, महेश शिंपी मोहन सोनावणे, भुषण सोनवणे, सुमित अहिरराव, चेतन नेरपगार, निलेश चव्हाण, विशाल देवरे, जिग्नेश सोनवणे, अशोक सोनवणे, युदिश खैरनार, मयूर शिंपी या असंख्य युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.