⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

शिक्षणशास्र महाविद्यलयात स्नेहसंमेलन उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । येथील केसीई सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रतिबिंब २०२१-२२ वार्षिक स्नेह संमेलन दि.२५ रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून साजरी करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर,क्रीडा संचालक ,मू.जे.महाविद्यालय उपस्थित होते.दि.२६ रोजी सकाळी १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्या ज्योती गोस्वामी, का.उ.कोल्हे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या उपस्थितीत झाले.यावेळी मंचावर प्राचार्य प्रा.अशोक राणे , उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी,प्रा.निलेश जोशी,डॉ.रंजना सोनावणे,डॉ.कुंद बाविस्कर,प्रा.प्रवीण कोल्हे,प्रा.साधना झोपे उपस्थितीत होते.यावेळी विद्यार्थ्यांनी नवीन गाण्यावर ठेका धरत नृत्य,गीत सादर केले.शेला पांगोटे,राम्प वाक,फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थी परिषद,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षेक्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.