⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगाव विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी डॉ. वाडेकर यांची नियुक्ती

जळगाव  लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । चाळीसगाव येथील सुप्रसिद्ध शैलजा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. मंगेश वाडेकर यांची खासदार उन्मेश पाटलांच्या शिफारसीने जळगाव विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

जळगाव विमानतळावर सायंकाळी पाच वाजता झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत नवनिर्वाचित सदस्य डॉ. मंगेश वाडेकर यांचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. चंद्रकांत गवळी नवनिर्वाचित सदस्य अशोकदादा जैन ,प्रेम कोगटा, डॉ भालचंद्र पाटील, सतीश देशमुख, विमानतळ संचालक सुनील मोंगीरवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जळगाव विमानतळाच्या विकासावर चर्चा करण्यासाठी  नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉ. मंगेश वाडेकर यांनी जळगाव येथून औरंगाबाद पुणे नागपूर बंगलोर मद्रास दिल्ली या मोठ्या शहरांमध्ये एअर अंबुलन्सद्वारे पेशंट ने-आन करण्यासंदर्भामध्ये व्यवस्था करावी, अशी मागणी डॉ. वाडेकर यांनी मांडली. तिचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.