⁠ 
शनिवार, मे 4, 2024

बालकवींचे भव्यदिव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे – गुलाबराव वाघ

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२३ । आज रविवार रोजी ब्राह्मण तलाव शेजारील शेतात ज्या औदुंबराच्या झाडाखाली निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या काव्य प्रतिभेला जन्म देत बालकवी कविता लिहत असत त्याच जागेवर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवसेना तालुका प्रमुख लेखक,कवी जयदीप पाटील यांच्या हस्ते बालकवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून बालकवींची १३३वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलतांना पक्षाचे नेते गुलाबराव वाघ यांनी कविवर्य बालकवी तसेच त्यांच्या साहित्य क्षेत्रात केलेली माहिती विषद केल.

धरणगाव शहराची ओळख बालकवींमुळे संपूर्ण जगाला झाली.त्यांनी आपल्या अवघ्या २८ वर्षांच्या कालावधीत एकूण १६३कविता लिहल्या. त्यात औदुंबर,फुलराणी,पारवा,निर्झरास,श्रावणमास,आनंदी आनंद गडे आदी कविता खूपच लोकप्रिय आहेत.अशा प्रतिभासंपन्न कविवर्य बालकवींचा मृत्यूला सुध्दा १०५ वर्ष झालीत.तरी सुध्दा शासन तसेच लोकप्रतिनिधींकडून बालकवींचे स्मारक पूर्ण होऊ शकत नाही.याबाबत गुलाबराव वाघ यांनी खंत व्यक्त केली.

मतदारसंघात आजपर्यंत जे जे लोकप्रतिनिधी झाले त्यांनी बालकवींच्या स्मारकाबाबत अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे.बालकवींच्या स्मारकाविषयी हेळसांड सुरू आहे याबाबत मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली.भविष्यात बालकवींचे स्मारक लवकरात लवकर न उभारले गेल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा गुलाबराव वाघ तसेच निलेश चौधरी यांनी दिला.

त्याप्रसंगी शिवसेनेचे जळगाव लोकसभा सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, जिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, तालुकाप्रमुख जयदीप पाटील, शेतकरी तालुकाप्रमुख विजय पाटील, उप तालुका प्रमुख कृपाराम महाजन, तालुका समन्वयक संतोष सोनवणे,शहर प्रमुख भागवत चौधरी ,मा नगरसेवक किरण मराठे, नगरसेवक जितेंद्र धनगर, महेश चौधरी रवींद्र आहिरे, गजानन महाजन, हेमंत महाजन, संजय धामोळे, गोपाल महाजन, बापू महाजन, गोविंद पाटील ,संजय पटूने ,बंटी पवार, सतीश बोरसे , किरण अग्निहोत्री, रणजीतसिंग शिकरवार, जगदीश पाटील, रवि जाधव ,जिभाऊ पाटील, सुभाष महाजन, पंकज महाजन, प्रसिद्धी प्रमुख गजानन महाजन ,मंगेश पाटील, गोपाल पाटील, विनोद रोकडे, तसेच शिवसेना युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.