उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता ; गुलाबरावांचे वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचवणारे

ऑक्टोबर 10, 2022 11:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ । शिंदे गटाचे सदस्य तथा राज्याचे मंत्री ना. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पुन्हा एकदा शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवलं गेल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर टीका केली आहे. मात्र, यावेळी टीका करण्याबरोबरच गुलाबराव पाटील यांनी भुवया उंचवणारे विधान केले आहे.

gulabrao patil jpg webp

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता असे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हंटलंय. गुलाबराव पाटलांचं हे विधान अनेकांच्या भुवया उंचवणारे असले तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांना विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणत टीका केली आहे. गुलाबराव पाटील यांनी यापूर्वी देखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लक्ष करत शिंदे गटाची बाजू लावून मांडण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हंटलंय, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता, एकनाथ शिंदे यांना परत बोलवायला पाहिजे होते. पण त्यांनी आमदारांना बोलावलं, त्यांना बोलवण्यापेक्षा एकनाथ शिंदेंना बोलवायला पाहिजे होते. मात्र उद्धव ठाकरेंनी ते केले नाही.उद्धव ठाकरेंना प्लॅन करता आले नाही, त्यात मुलाला बोलायला आमच्या अंगावर सोडलं, असेही ते म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now