मंत्री गुलाबरावांनी संजय राऊंतांवर हाणला टोला : म्हणाले पक्ष कसा सांभाळायचा हे शरद पवारांकडून शिकावे..
जळगाव लाईव्ह न्यूज : 27 ऑगस्ट 2023 : राज्यात सत्तानंतर झाल्यासून सर्वच पक्षाचे ननेते एकमेकांना हल्लाबोल करत आहे. यातच आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लागवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरही राष्ट्रवादी एकसंध असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामुळे पक्ष कसा सांभाळायचा हे संजय राऊत यांनी शेजारी बसलेल्या शरद पवारांकडून शिकावे, असा टोला गुलाबराव पाटील यांनी राऊतांना हाणला आहे.
शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे नेते असल्याचा दावा केला केल्यानंतर याविषयी गुलाबराव पाटील यांना छेडले असता त्यांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बाब असल्याचे स्पष्ट केले. नेतेपद हे राष्ट्रवादी कॉंग्रेसची अंतर्गत गोष्ट आहे. कोण कुणाचे नेते आहेत, हे त्यांच्या पक्षानेच ठरवण्याची गरज आहे, असे पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडणारे व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे दोन्ही नेते आम्ही सर्व एकत्रच असल्याचा दावा करत आहेत. याऊलट त्यांचे एकमेकाविरूध्द सभा घेणेही सुरू आहे. या दोन्ही गटाच्या नेत्यांची विधाने पाहिल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सर्वकाही एकदिलाने सुरू असल्याचे स्पष्ट होते. तसेच हे सर्व एकमताने झाल्याचेही शिक्कामोर्तब होते, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
पवारांकडून बोध घ्या
राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही, तर तो एकसंध आहे, असे चित्र सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण केले जात आहे. पक्षात फुट पडली असली तरी पक्ष कसा सांभाळायचा संजय राऊत यांनी आपल्या शेजारी बसलेल्या शरद पवार यांच्याकडून शिकावे. त्यांच्याकडून योग्य तो बोध घ्यावा, असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.