⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

देवकर नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी मोजक्याच जागा शिल्लक

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२२ । येथील शिरसोली रस्त्यावरील श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ संचलित गुलाबराव देवकर नर्सिंग कॉलेजमध्ये सन 2021 – 22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, नीट परीक्षेच्या राउंडनंतर आता मोजक्याच जागा शिल्लक राहिल्या आहेत. हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहे.

देवकर बीएससी नर्सिंग महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी साठ जागांवर प्रवेश देण्यास शासनाने मान्यता दिली आहे, त्यानुसार ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयासाठी अद्ययावत सुविधा आणि इमारत संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. या कोट्यातही आता प्रवेशासाठी मोजक्याच जागा शिल्लक राहिल्या आहेत. बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ही मोठी संधी आहे.

प्रवेशासाठी पात्रता

  • बारावी सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी व इंग्लिश या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्याला किमान 45% गुण असणे आवश्यक. आरक्षित प्रवर्गासाठी 40 % गुण आवश्यक.

नीट परीक्षा ऍपियर असणे आवश्यक.

वयोमर्यादा किमान 17 वर्षे