जळगाव शहरराजकारण

भोसरी भूखंड प्रकरणात खडसे निर्दोष असतील तर घाबरण्याची गरज नाही ; गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची पुन्हा चौकशी होणार आहे. त्यामुळे खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यात सरकारकडून छळ केला जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. आता यावर शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील Gulabrao Patil) यांनी उत्तर दिले आहे.

भोसरी प्रकरणात पुन्हा चौकशी करण्याचे हे प्रकरण आम्ही नाही, तर तपास यंत्रणांनी काढलेले आहे. ही चौकशी म्हणजे तपास यंत्रणांचा तपासाचा भाग आहे. एकनाथ खडसे यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे आणि जर ते यात निर्दोष असतील तर त्यांना घाबरण्याची गरज नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
आमदार फुटीच्या बातमीवर ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सामना हे वर्तमानपत्र कोणाचे आहे हे सर्वांना माहीत आहे. आपले राहिलेले आमदार सांभाळण्यासाठीच त्याचे हे वक्तव्य असेल असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना लगावला आहे. शिंदे गटातील काही नाराज आमदार फुटून ते भारतीय जनता पक्षात जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात देण्यात आली होती. त्यावर बोलताना मंत्री पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button