---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

Loksabha Election : सकाळी 11 पर्यंत जळगावात 16.89 तर रावेरात 19.03 टक्के मतदान, येथे झाले सार्वधिक कमी मतदान

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२४ । लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील जळगाव आणि रावेरसह ११ लोकसभा मतदारसंघात आज सोमवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी ११ पर्यंत जळगाव लोकसभा मतदारसंघात 16.89 % तर रावेर लोकसभा मतदारसंघात 19.03 % मतदान झाले.

loksabha election jpg webp

दरम्यान, जळगाव मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान जळगाव शहरात झाले. १० टक्के इतके मतदान जळगाव शहरात झाले. तर सर्वाधिक मतदान एरंडोल येथे २१.५५ टक्के इतके मतदान झाले. तसेच अमळनेर १८.४२ टक्के, चाळीसगाव १६.०१ टक्के, पाचोरा १६.१४ टक्के, जळगाव ग्रामीणमध्ये २०.४५ टक्के आणि पाचोरा १६.१४ टक्के

---Advertisement---

दुसरीकडे रावेर मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक कमी मतदान जामनेर येथे झाले. जामनेरमध्ये १५.८७ टक्के इतके मतदान झाले. तर सर्वाधिक मतदान चोपडा येथे २०.९५ टक्के इतके झाले. भुसावळात १८.६३टक्के, मलकापूर २०.८५ टक्के, मुक्ताईनगरात १७.६० टक्के, रावेर मध्ये २०.५० टक्के इतके मतदान पार पडले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---