महाराष्ट्रराजकारण

राज ठाकरेंना देखील खडसेंच्या सीडीची उत्सुकता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२१ । भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह परिवाराच्या मागे ईडीची चौकशी लागली असून मी खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय अशी खोचक प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.

पुणे शहर कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथराव खडसे यांची चौकशी सुरू आहे. ईडी विभाग आघाडी सरकारच्या काळातही होता आणि भाजप सरकारच्या काळातही आहे. ईडी काही तुमच्या हातातील बाहुले नसून त्याला कुणीही कसेही हाताळतात. ज्याने खरोखर गुन्हा केला असेल त्याची चौकशी करण्यात यावी. खडसेंच्या सीडीची मी वाट पाहत असल्याचे राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Raj Thackeray on Eknath Khadse ED enquiry : मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय : राज ठाकरे

godavari advt (1)

Related Articles

Back to top button