एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र आले तर..; मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

जून 17, 2024 4:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२४ । राज्यातील राजकारणात कधीकाळी एकाच पक्षात असलेले माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे आणि भाजप नेते अन् मंत्री गिरीश महाजन मित्र होते. मात्र भाजपमध्येच असताना दोघांमधील वाद विकोपाला गेला. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.

gulabrao patil girish mahajan khadse jpg webp

मात्र आता एकनाथ खडसे शरद पवारांची साथ सोडून पुन्हा भाजपात घरवापसी करणार आहे. परंतु त्यांचा प्रवेश सोहळा अनेक महिन्यांपासून थांबला आहे. यामुळे आता एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र येतील त्यांना एकत्र आणण्याची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे पार पाडतील, असा विश्वास शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न असेल तेव्हा एकत्र असावे. ही माझीस नाही तर जनतेची सुद्धा अपेक्षा असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यामांशी बोलताना म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे व गिरीश महाजन त्यांना एकत्र आणणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. रक्षा खडसे जर या दोघांना एकत्र आणत असतील तर त्यांना आमची सुद्धा सदिच्छा आहे. असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now