..तर त्यांनी माझ्या गावी यावं ; सभागृहात अबू आझमींवर गुलाबराव पाटील कडाडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२३ । राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यादरम्यान, राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लव्ह जिहादबाबत धक्कादायक माहिती दिली. राज्यात लव्ह जिहादची 1 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली असल्याचे लोढा यांनी सांगितले. यावरून आज विधानसभेत मोठा गदारोळ झाला असून समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी लव्ह जिहाद नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसल्याचे म्हटलं. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील अबू आझमी (Abu Azmi) यांची मागणी लावून धरली.”

आझमी आणि आव्हाडांच्या मागणीनंतर शिवसेना आमदार गुलाबराव पाटील मैदानात आले. “ज्यांना वाटत असेल की, लव्ह जिहाद नावाची गोष्ट अस्तित्वात नाही त्यांनी माझ्या गावी यावं. माझ्या गावातही अशी दोन प्रकरणं झाली आहेत, असे म्हणत अबू आझमींवर गुलाबराव पाटील बरसले. तसेच आव्हाडांना म्हणाले की, तुम्ही मुंब्र्यात राहता म्हणून बोलू नका. तुम्हाला त्यांची (मुस्लीम मतदार) गरज आहे म्हणून बोलत आहात.”

लव्ह जिहाद वरून विधानसभेत मोठा गदारोळ झाला असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी यावरून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला. आमदार अबू आझमी यांनी मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातल्या जनतेची माफी मागावी अशी मागणी. झमी म्हणाले की, “मी मागणी करतो की लोढा यांनी चुकीची माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांना माफी मागायला सांगा. कारण लव्ह जिहाद नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील अबू आझमी यांची मागणी लावून धरली होती. त्यामुळे मोठा सभागृहात गदारोळ झाला.