‘मविआ’ चे उमेदवार जाहीर झाल्यानंतर सर्व विरोधक आपल्यासोबत येतील; मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात महायुतीला लोकसभेत जे यश मिळाले तेच विधानसभेतही मिळेल. अद्याप महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली नाहीत. नावे जाहीर होऊ द्या त्यानंतर सर्व विरोधकही आपल्यासोबत येतील, असा गौप्यस्फोट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
जळगाव तालुक्याच्या महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी सांगितले की, प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीच्या बुथचे सूक्ष्म नियोजन करून एकजुटीने आपले गाव व आपला बुथ ही जबाबदारी पार पाडावी. महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी साठी सज्ज राहा.
विरोधी उमेदवार कोण..? यापेक्षा महायुतीचा धनुष्यबाण हेच डोळ्यासमोर ठेवा. धरणगाव येथे २४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखला करणार असून, महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा गुलाबराव पाटील आहे, असे समजून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. खासदार स्मिता वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले.