गुलाबराव पाटील खान्देश भूषण : त्यांच्यावरची टीका थांबवा अन्यथा मुंबईत रस्त्यावर उतरू

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत आहे. यामुळे रुपाली पाटील, शरद कोळी आणि सुषमा अंधारे यांच्याकडून केली जाणारी आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी थांबवावीत, अन्यथा आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिला आहे.

आम्ही मुंबई, ठाण्यात राहतो, गुलाबराव पाटील हे खान्देश भूषण आहेत. त्यांचा ३५ ते ४० वर्षांचा राजकीय प्रवास आहे. राजकीय भाषणात नेते बोलत असतात मात्र पाटील यांच्या वक्तव्याची काटछाट करून सीमा ओलांडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. हे आम्ही सहन करणार नाही. गुलाबराव पाटील यांनी महिलांविषयी कधीही आक्षेपार्ह टीका केलेली नाही. त्यांच्याविषयी खालच्या पातळीवरील टीका सहन केली जाणार नाही, अन्यथा आम्हीही त्याविरोधात मुंबई ठाण्यात रस्त्यावर उतरू असा इशारा उत्तर महाराष्ट्र मंडळ कार्याध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिला आहे.