जळगाव जिल्हा
ना. गुलाबराव पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२४ । जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते ना. गुलाबराव पाटील यांनी आज धरणगाव येथे मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे नेते ना. गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे ग्रामीण आमदार आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संधी देण्यात आली. आज गुलाबराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांचा भव्य ताफा धरणगावात दाखल झाला होता. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करत गुलाबराव पाटील यांनी आज दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.