संजय राऊत म्हणजे घिसीपीटी कॅसेट ; मंत्री गुलाबराव पाटलांची टीका

ऑक्टोबर 8, 2023 11:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२३ । जळगावात नवनियुक्त संपर्कप्रमुख मनोज हिवरे आणि मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे बैठक पार पडली. यावेळी गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो तरुणांनी शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ना गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

gulabrao patil sanjay raut

काय म्हणाले गुलाबराव पाटील?
मागील काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या पीक विम्यावरून गुलाबराव देवकर यांनी शिंगाडा आंदोलनाचा इशारा दिला होता. यावर पत्रकारांनी विचारले असता ना.पाटील म्हणाले की साडेचार वर्षे हा माणूस पालकमंत्री राहिला. त्यांनी कधी हातात माईक घेतला नाही. डीपीडीसीच्या झालेल्या सर्व सभा एकनाथ खडसेंनी चालवल्या, असा टोला गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांच्यावर लगावला.

दुसरीकडे संजय राऊत यांच्यावरही टीका केलीय. संजय राऊत म्हणजे घिसीपीटी कॅसेट आहे, तिला महत्व देत नाही. राऊत यांच्या म्हणण्याला मी फार महत्त्व देत नाही, असं सांगत पाटील यांनी राऊत यांच्या टीकेवर अधिक प्रतिक्रिया देणं टाळलं. राऊत यांनी फडणवीस यांचा उल्लेख मदारी असा केला होता. त्यावर ते बोलत होते.

कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या
दरम्यान, विधानसभा निवडणुका जवळ आल्याने कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं काम सर्वच राजकीय पक्षांकडून केलं जात आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम सुरू केलं आहे. तुम्ही हरला तर पावती माझ्या नावावर फाटेल. पण मी हरलो तर फटाके तुमच्या घराजवळ फुटतील, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now