⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

कई लोग अपने बाप बदल लेते है… जळगावात मिम्सचा पाऊस

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ गुलाबराव पाटील हे शिंदे गटाला मिळाले आहेत. गुलाबराव पाटील यांचा भाषणामुळे आजवर कित्येक शिवसैनिकांना हूरूप येत होते. त्यांचा शब्द नी शब्द ऐकण्यासाठी शिवसैनिक त्यांच्या सभेला मोठी गर्दी करायचे. मात्र आता हेच शिवसैनिक गुलाबराव पाटलांना ट्रोल करत आहेत.

कतलीया कही कात बदल लेते हे
पुण्य के आड मे पाप बदलते है
पर कई लोग अपने बाप बदल लेते है

हे गुलाबराव पाटील यांचे वाक्य मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. आणि शिवसैनिक यापुढे कट्टर शिवसैनिक असे लिहून आम्ही आमचा बाप बदलणार नाही अशाप्रकारे गुलाबराव पाटील यांना ट्रोल करत आहेत.

मात्र केवळ गुलाबराव पाटील ट्रोल होत आहेत असा आहे का? तर तसंही नाही/ गुलाबराव पाटील यांच्या बरोबार गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे हे देखील ट्रोल होत आहेत. याच्या मागचं कारण म्हणजे जिल्ह्यामध्ये आलेली सध्याची राजकीय स्थिती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना देखील चांगलं ट्रोल केला जात आहे.

काय आहेत संदेश…

फुटले आहेत ते खरे, मात्र यांचा ज्योतिरादित्य होतो की पायलट… हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल……

२ संजय राऊत भाला, खंजीर, वाघनखं घेऊन गुवाहाटीला रवाना… फुटलेल्यांचा कोथळा बाहेर काढणार

मुंबई तोडण्याचा त्यांचा डाव ३ होता, आता सुरतच महाराष्ट्राला जोडतो… एकनाथ शिंदे उवाच…

मोदी तुकारामांच्या भेटीला आले अन् एकनाथ घेऊन गेले….

पंढरपूरचा विठ्ठलही संभ्रमात, पूजेला कोणता मुख्यमंत्री येणार..?

२१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवस, की वर्षातला शेवटचा दिवस…..

माझा एकनाथ तुझ्यात, तुझा एकनाथ माझ्यात….ओम फट् स्वाहा…

मात्र या सगळ्यांमध्ये कोणीही बाळासाहेब ठाकरे या नावाला हात लावू इच्छित नाही. एकीकडे एकनाथ शिंदे ट्रोल होत आहेत. एकीकडे गुलाबराव पाटील होत आहेत एका ठिकाणी उद्धव ठाकरे होत आहेत मात्र कोणीही कुठेही खुद्द बाळासाहेबांना ट्रोल करायची हिंमत करत नाहीयेत. कारण याचे होणारे परिमाण त्यांना माहित आहेत.