गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन

जून 10, 2025 10:21 AM

जळगाव — विद्यार्थ्यांना शासकीय व नर्सिंग क्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळावे, तसेच त्यांची तयारी योग्य दिशेने व्हावी या उद्देशाने गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आले.

New Project 1

स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व इंट्रोडक्शन यामध्ये एम्स, नॉरसेट,डीएमईआर, एनएचएम२ इएसआयसी, आरआरबी यांसारख्या परीक्षा व त्यांचा अभ्यासक्रम, तयारीची रणनीती, वेळापत्रक नियोजन, पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण याविषयी सखोल मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य तंत्र समजावून देण्यासाठी अनुभवी प्राध्यापक व तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले. प्रथम सत्रात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची संकल्पना, पात्रता निकष, नोकरीच्या संधी, व तयारीचे महत्त्व या विषयांवर माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासह, त्यांना नियोजनबद्ध अभ्यास करण्यासाठी आवश्यक टिप्स देखील देण्यात आल्या.या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य विशाखा रणवीर यांच्या हस्ते करण्यात आले. उपप्राचार्य जसनीत दया ,विभागप्रमुख व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी आवश्यक दिशा मिळणार आहे, असे प्राचार्यांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोदावरी नर्सिंगच्या शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment