आजारी मित्राच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पालकमंत्री पोहोचले बोरगावला

जून 10, 2025 5:08 PM

जळगाव लाईव्ह न्युज | जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोरगाव येथे भेट दिली, विशेष म्हणजे पालकमंत्र्यांची ही भेट कोणतीही राजकीय करण्यासाठी नव्हती किंवा सभेसाठी व विकास कामांच्या उद्घाटनासाठी देखील नव्हती, ही भेट होती त्यांच्या एका जुन्या मित्राच्या तब्येतीची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी… या घटनेमुळे नामदार गुलाबराव पाटील यांच्यातील हळवे व्यक्तिमत्व पुन्हा एकदा समोर आले आहे.

PalakMantri Borgaon

नाना पाटील हे गेल्या पंचवीस वर्षांपासून नामदार गुलाबराव पाटील यांची जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. नामदार पाटील कधीही बोरगाव परिसरात आले की नाना यांची भेट घेतल्याशिवाय जात नाहीत दरम्यान नाना यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पालकमंत्र्यांना गावातील कार्यकर्त्यांकडून मिळाल्यानंतर त्यांनी आपले पुढचे सर्व कार्यक्रम रद्द करत बोरगावला भेट देऊन नाना यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

वैद्यकीय उपचारासाठी कोणतीही मदत हवी असल्यास मित्राला हक्काने आवाज दे, असेही त्यांनी सांगितले. एक मंत्री आपले सर्व कार्यक्रम रद्द करून एका मित्राच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी थेट त्याच्या घरात पोहोचतो हे पाहून मैत्री व आपुलकीची भावना आजही जिवंत असल्याचे अनेकांनी बोलून दाखवली. या भावनिक भेटीदरम्यान गावाचे सरपंच भैय्या मराठे, पिंटू पाटील, नितीन पाटील, किशोर मराठे, समाधान मराठे,रवींद्र मराठे यांच्यासह गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या या भावनिक भेटीची चर्चा पंचक्रोशीत होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment