⁠ 
शनिवार, सप्टेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन ; पालकमंत्री गुलाबराव पाटीलांनी केलं स्वागत

जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन ; पालकमंत्री गुलाबराव पाटीलांनी केलं स्वागत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लखपती दिदी मेळाव्यासाठी आज जळगाव विमानतळावर आगमन झाले. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही स्वागत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले‌.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागत प्रसंगी राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. विमानतळ स्वागतानंतर त्यांनी तेथे उपस्थित लखपती दिदींशी संवाद साधला. त्यानंतर त्यांचे लखपती दिदी संमेलन स्थळी आगमन झाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.