
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । केंद्र शासनाने जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहेे. यामुळे पॅकिंगच्या सर्व डाळी पाच रुपयांनी, पोहे, मुरमुरे, रवा, मैदा दाेन रुपयांनी तर गहू, ज्वारी, बाजरी दीड रुपयांनी महागले. मात्र, हे सर्व साहित्य पॅकेजिंगमध्ये न घेता सुटे घेतल्यास हा भुर्दंड बसणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

जीएसटी कराच्या निर्णयामुळे स्थानिक बाजारपेठेत लहान दुकानदार, शेतकऱ्यांकडून गहू, ज्वारी, बाजरी घेऊन विकणार असल्याने ग्राहक, दुकानदार व शेतकरी या तिन्हींचा फायदा होऊ शकतो. अनब्रँडेड वस्तूंची मागणी वाढण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली. खाद्यतेलावर काही परिणाम नसून, आणखी दहा रुपये किंमत घटण्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले.३० किलोच्या पॅकिंगपर्यंत पाच टक्के जीएसटी लागेल. शहरात मोठ्या प्रमाणात पॅकेजिंगचे दूध, दही, ताक, चीज, तूप आदी साहित्य २५० ते एक लिटर अथवा किलोग्रॅमच्या पॅकिंगमध्ये विक्री होते.
सर्वसामन्य जनतेला बसलेला हा भुर्दंड अतिशय चुकीचा आहे. महागाईचा चटका आता सर्वसामान्य जनतेला सोसवत नाहीये. लवकर नागरिकांना यातून दिलासा देणे गरजेचे आहे.
ज्ञानेश्वर सोनार, सर्वसामान्य नागरिक
नागरिक म्हणून हि एक चुकीची बाब वाटते. महागाई अधिच जास्त आहे. त्यात हा भुर्दंड अधिक झाला आहे. आता लवकरच सरकार निर्णय घेईल अशी अपेक्षा
हेतल वाणी








