जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । कुंसुंबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय लष्कर जवानाच्या सपत्नीक’च्या हस्ते महाआरती करण्यात आली.

यावेळी शिवजन्मोत्सव सजीव देखावा व शिवजन्मोत्सव गित स्वामी समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थींनीं सादर केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी पथक व झेंडा सादर केली. यात शाळेतील मान्यवर व शिक्षक वृंद सहभागी होते. शिवजयंती निमित्ताने कुंसुंबा दत्तमंदीर येथे अल्पदरात शासकिय योजना शिबीर (अभियान) राबविण्यात आले.

कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे, इश्वर पाटील, वसंत पाटील, शैलेश साळुंखे, रविंद्र कोळी, विजय सोनार, निर्मल पाटील, गणेश पाटील, राजेंद्र पाटील, भरत महाजन, योगेश घुगे, मुकेश पाटील, किरण राजपुत उपस्थित होते.
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






