जळगाव जिल्हा
उध्दारली कोटी कुळे, भीमा तुझ्याजन्मामुळे…!
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२४ । जळगाव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंतीच्या निमित्ताने भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकीताई पाटील यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले.
याच बरोबर भारतीय जनता पार्टी कडून भाजपा कार्यालय (जी.एम फाउंडेशन)येथील कार्यक्रमास उपस्थित लावून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ही केले.
यावेळी जळगावचे आमदार श्री.राजू मामा भोळे, जिल्हा अध्यक्ष सौ.उज्वलाताई बेंडाळे भाजपाच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ,महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या सचिव रेखाताई वर्मा,जिल्हा सरचिटणीस अरविंद भाऊ देशमुख, डॉ राधेश्याम चौधरी, शहर उपाध्यक्ष सुनील भाऊ खडके,माजी महापौर सौ.सीमाताई भोळे यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.