जळगाव शहरसामाजिक

बहुजन विद्युत अभियंता अधिकारी फोरम तर्फे अभिवादन सभा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज। १४ एप्रिल २०२२ । येथील बहुजन विद्युत अभियंता अधिकारी, कर्मचारी फोरम तर्फे जळगाव विभाग कार्यालयात आज दि १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येऊन अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती.

सभेस जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेळकर व जळगाव परिमंडळ सचिव विजय सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले. मुख्य अभियंता यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या कार्याची माहिती देवून त्यानुसार प्रत्येकाने जीवन जगावे असे आवाहन केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. विजय सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब यांचे कामगारांसाठी केलेल्या कार्य याची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्व कामगारांना समजावेत म्हणून संघटने तर्फे बाबासाहेबांचे कार्य व विचारांचे पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

सभेस अति.कार्यकारी अभियंता धिरज बारापात्रे, उपकार्यकारी अभियंता मेघश्याम सावकारे सह सिद्धार्थ भालेराव, चेतन नागरे, राहुल वडनेरे, चरण पांढरे, प्रशांत शिरसाळे, प्रशिक भास्कर, नितीन रामकुवर, महेश अडकमोल, सचिन जाधव, गोदावरी पवार, प्रियतमा बुंदेले, यामिनी तायडे, संध्या चत्रे, भरत तायडे, नरेश सोनवणे, पंकज सोनवणे, योगेश सोनवणे बशीर तडवी, अस्लम शेख सह मोठ्या संख्येने सभासद, अभियंता उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button