भुसावळ येथे वडिलांना दिला मुलीने मुखअग्नी

ऑगस्ट 21, 2022 8:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२२ । भुसावळ येथील जुना जळगाव रोडवर असलेल्या भिरुड कॉलनीत दि.२१ रविवार रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान पंढरी ओंकार बोखारे-पाटील यांचे वृद्धपकाळात वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.पंढरी बोखारे-पाटील यांना एकच मुलगी निलीमा सुनील पाटील यांनी वडिलांना मुखअग्नी दिला.

धर्म शास्त्र नुसार आई वडील यांच्या निधनानंतर मुलगा मुख अग्नी देतो.असे असले तरी २१ व्या शतकातील परिवर्णवादी विचारांच्या निलीमा यांनी वडिलांच्या निधनानंतर अग्नी देण्याचा निर्णय घेतला. नीलिमा यांच्या निर्णयाचे समाज बांधवांनी कौतुक केले.निलीमा व त्यांचे पती सुनिल माणिक पाटील हे दोघे पती,पत्नी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.

सुनिल पाटील छत्रपती क्रांती सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आहे. पाटील कुतुबात शाहू ,फुले, आंबेडकर विचारांचा पगडा असून हे कुटूंब समाज सेवा हेच आपले कर्तव्य समजत असतात निलीमा पाटील यांच्या धाडसाचे महिलानमध्ये सर्वत्र कौतुक होताना दिसले. महिला ही सर्वच क्षेत्रात सक्षम असल्याचा हा पुरावा आहे. सुनिल पाटील हे योगेश बोखारे-पाटील, संजय बोखारे-पाटील यांचे काका होत.

bhusaval news

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now