जळगाव शहर

ओरियन सीबीएसई ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडियम स्कूलच्या ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

इयत्ता बारावीच्या परीक्षेत योगेश्वरी प्रशांत कोल्हे या विद्यार्थ्यानीने ९२.४०% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर चेताली सचिन पाटील हिने ९०.८०% टक्के गुण मिळवत द्वितीय स्थान मिळविले आहे तर पूनम वेंकटेश विटलदेवूनी या विद्यार्थिनीने ९०.०० %टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावलेला आहे.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी अभिनंदन केले आहे, तसेच स्कूलच्या प्राचार्य सुषमा कंची व उपप्राचार्य माधवीलता सिट्रा यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेची नियोजन बद्ध शिक्षण प्रणाली, शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन व विद्यार्थीची मेहनत या सर्वांच्या समन्वयातूनच आज हे यश प्राप्त होऊ शकले आहे. शाळेच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button