⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावातील तरुणीची पाच लाखांत फसवणूक

जळगावातील तरुणीची पाच लाखांत फसवणूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । शहरातील अयोध्या नगरात वास्तव्यास असलेल्या २९ वर्षीय तरुणीची ऑनलाईन मोबाईलद्वारे तब्बल ५ लाख ४० हजारात फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अयोध्या नगरातील रहिवासी असलेली एका २९ वर्षीय तरुणीला दि. ९ व १० रोजी तिच्या मोबाईलवर अनोळखी इसमाने व्हाटसअपवर संदेश पाठवीत ‘तुम्हाला एका महाविद्यालयात पीएचडीची फी भरण्यास सागितले. दरम्यान, तरुणीच्या परवानगीशिवाय इंटरनेट बँकिगचे आयडी व पासवर्ड घेत बँकेतून गुप्तपणे ४ लाख ७९ हजार तसेच युपीआयहून ६१ हजार असे एकूण ५ लाख ४० हजार रुपये लांबविले.

दरम्यान, फसवणूक झालेल्या तरुणीने तत्त्काळ सायबर पोलिसात धाव घेत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.नीलीलाधर कानडे हे करीत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह