जळगावमध्ये भव्य प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; विविध कंपन्यांकडून भरती

जुलै 1, 2025 5:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव व मॉडेल करिअर सेंटर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०३ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. हे ड्राईव्ह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंड जवळ, जळगाव येथे होणार आहे.

job fair

या ड्राईव्हमध्ये जस्ट डायल लि., जळगाव, स्टार फेब्रिकेटर्स, जळगाव व मे. वैदिक इंटरप्रायजेस, जळगाव या तीन नांमाकित उद्योजकांनी एकुण २१ रिक्त पदे कळवलेली असून, इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेसह संबंधित सर्व मूळ कागदपत्रे व त्याच्या छायांकित प्रतीसह उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनी देखील आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहता येईल. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now