१० वी, १२ वी ते पदवीधरांना थेट नोकरी; जळगावात १५ जुलैला भव्य रोजगार मेळावा

जुलै 13, 2026 5:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव, मॉडेल करिअर सेंटर, जळगाव आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे.

rojgar fair jpg webp

या रोजगार मेळाव्यात प्रामुख्याने इलेक्ट्रिकल क्षेत्रातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी २०७ हून अधिक रिक्त पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यात जैन इरिगेशन प्रा. लि., स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्स प्रा. लि., छबी इलेक्ट्रिकल्स प्रा. लि., रेमंड प्रा. लि., लिग्रण्ड प्रा. लि., अॅस्टीमो प्रा. लि., एडीको प्रा. लि. (पुणे) तसेच आकाशवाणी, जळगाव यांसारख्या नामांकित आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. सदर पदांसाठी आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी, बी.ई., बी.टेक., बी.एस्सी., पदवीधर, इंजिनिअरिंग असिस्टंट तसेच इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर नोंदणी करून संबंधित रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत. ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व बायोडाटासह मुलाखतीच्या दिवशी रोजगार मेळाव्यात उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव संदीप ज्ञा. गायकवाड यांनी प्रसिध्दी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories