मुख्यमंत्री फडणवीसांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

जुलै 21, 2026 5:43 PM

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाचा उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, आषाढी एकादशी व रक्षाबंधनाच्या निमित्ताने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय, जळगाव येथे आजपासून ‘भव्य आरोग्य संपदा शिबिराला’ प्रारंभ झाला आहे. हे शिबिर २१ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत बाह्यरुग्ण विभागात सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

health 1 jpg webp

रुग्णालयात विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.शिबिरात डॉ. युवराज बढे (छाती व फुफुस रोग तज्ञ) आणि डॉ. रोशन राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ताप, सर्दी, खोकला, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, थायरॉईड, किडनी व लिव्हरचे आजार, श्वसनाचे विकार, दमा, क्षयरोग,सीओपीडी तसेच इतर विविध आजारांवर तपासणी व उपचार केले जाणार आहेत.या शिबिरामध्ये आवश्यकतेनुसार डायलिसिस, ब्राँकोस्कोपी, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, २ॄ इको कार्डिओग्राफी, ऑक्सिजन, नेब्युलायझेशन, आयसीयू, व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत दाखल होणार्‍या रुग्णांसाठी तातडीची वैद्यकीय सेवा २४ तास उपलब्ध राहणार आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेणार्‍या रुग्णांनी आयुष्मान कार्ड सोबत आणावे. कार्ड नसल्यास मूळ रेशन कार्ड व आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. शासनाच्या योजनेत समाविष्ट नसलेल्या आजारांवरही शिबिरादरम्यान सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.तसेच शिबिरादरम्यान आवश्यक तपासण्या, ऑपरेशन्स व भरती होणार्‍या रुग्णांसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या असून, गरजू नागरिकांनी या आरोग्य संपदा शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now