‘श्री’चे भव्य आगमन सोहळा.. सावद्यात मानाच्या संभाजी मित्र मंडळाचे

सप्टेंबर 1, 2022 12:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२२ । सावदा येथे का ल दि. 31 रोजी सायंकाळी 7 वाजेदरम्यान येथील मानाच्या संभाजी मित्र मंडळाचे “श्री” चे भव्य आगमन सोहळा व स्थापना संपन्न झाली. यावेळी भुसावळ येथील आ. संजय सावकारे यांचे हस्ते गणपती स्थापना करण्यात आली.

jalgaon 21

यावेळी अध्यक्षस्थानी सावदा येथील माजी उपनगराध्यक्ष तथा उद्योजक शब्बीर हुसेन हाजी अख्तर हुसेन बोहरी बाबू शेठ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, नगरसेविका मीनाक्षी कोल्हे, विजया जावळे, प्रथितयश व्यापारी अरविंद अकोले, माजी नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे यांचेसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री ची स्थापना पूजा सतिषचंद्र जोशी यांनी सांगितली प्रसंगी संभाजी चौक परिसरातील व्यापारी व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

तसेच राजू साळी प्रभारी ग्रंथपाल नगरपालिका सावदा व छगन साळी सीनियर इंजिनियर अशोका बिल्डकॉन नाशिक यांचे सावदा येथील घरी बुधवार पेठ येथे दीडशे वर्षाची परंपरा असलेले दीड दिवसाचे उजव्या सोंडीचे शाडू मातीचे गणपती दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात विराजमान झाले, याच सोबत येथील सतिषचंद्र जोशी यांचे कडे देखील शतकोत्तर परंपरा असलेल्या उजव्या सोंडेच्या गणपतीची विधिवत शास्त्रोक्त पूजन करण्यात येऊन स्थापना करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now